करारपत्र
ई-बुक मांडणी व तयार करण्यासाठी करारपत्र
कृपया लेखकाचे नाव लिहा
कृपया वैध ई-मेल आयडी लिहा
कृपया पुस्तकाचे नाव लिहा
कृपया पुस्तकाचा प्रकार निवडा
कृपया १० अंकी मोबाईल नंबर लिहा
कृपया पूर्ण पत्ता लिहा
काम स्वीकारणारे: प्रभावती एंटरप्राइजेस, परभणी 431541
मालक: सुरेश नारायण कुंभार
मोबाईल क्रमांक: 7709043437
मालक: सुरेश नारायण कुंभार
मोबाईल क्रमांक: 7709043437
1. कामाचे स्वरूप
लेखकाने दिलेल्या मजकुरावरून ई-बुकची मांडणी व लेआउट करणे. कामामध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे:
- मुखपृष्ठ (Cover page)
- शीर्षक पृष्ठ (Title page)
- व्हर्सो पृष्ठ (Verso page)
- मनोगत / प्रस्तावना — लेखकाने दिलेली किंवा दोन्ही पक्षांनी ठरवलेली*
- अनुक्रमणिका (Index)
- सर्व प्रकरणांची मांडणी, स्पेसिंग, गॅपिंग आणि पानांचे लेआउट.
- पानाचा आकार: A4
- फॉन्ट: कोकिळा
- फॉन्ट साईज:
- अंतिम फाइलचा प्रकार:
2. शुल्क
- पहिल्या 100 अंतिम मांडणीतील पानांसाठी शुल्क 5000 रुपये असेल.
- 100 पानांपेक्षा जास्त प्रत्येक अतिरिक्त पानासाठी 20 रुपये प्रति पान शुल्क आकारले जाईल.
- अंतिम पानसंख्या मांडणी पूर्ण झाल्यावर ठरवली जाईल. उदाहरणार्थ, पुस्तक 125 पानांचे झाल्यास एकूण शुल्क 5500 असेल.
- भाषाशुद्धी (Proofreading), मजकूरलेखन (Copywriting), तथ्यतपासणी (Fact checking), छपाई (Printing), ISBN अर्जाची सेवा ही आमच्या दिलेल्या कामाव्यतिरिक्त अतिरिक्त कामे आम्ही करत नाही.
3. आगाऊ रक्कम व उर्वरित पैसे
- काम सुरू करण्यासाठी 3000 रुपये अग्रिम रक्कम (Advance) द्यावे लागतील.
- अंतिम पानसंख्या ठरल्यावर उर्वरित रक्कम लेखकाने भरावी.
- पूर्ण रक्कम मिळाल्यानंतरच अंतिम ई-बुक फाइल पाठवली जाईल.
4. लेखकाने द्यावयाची माहिती
- लेखकाने पुस्तकाचा संपूर्ण मजकूर, पुस्तकाचे नाव, लेखकाचे संपूर्ण नाव, मोबाइल नंबर, मेल आयडी, मुखपृष्ठासाठी लागणारी माहिती, पासपोर्ट फोटो आणि इतर आवश्यक तपशील शक्यतो एकाच वेळी द्यावेत.
- टप्प्याटप्प्याने मजकूर देणे किंवा नंतर मोठे बदल करणे, यामुळे कामाची मुदत व शुल्क बदलू शकते, याची आठवण ठेवा आणि शक्यतो सर्व माहिती एकाच वेळी देण्याचा प्रयत्न करा.
- लेखकाने दिलेल्या मजकुरातील माहिती, नावे, संदर्भ, आकडेवारी, उदाहरणे आणि चित्रे अचूक आहेत व वापरण्याची आवश्यक परवानगी त्यांच्याकडे आहे याची जबाबदारी लेखकाची राहील.
- काम स्वीकारणारे मजकुराची तथ्यतपासणी किंवा संदर्भ पडताळणी करत नाहीत. आमचे काम तुम्ही दिलेल्या माहितीला पुस्तकात रूपांतर करणे एवढेच आहे. त्यामुळे माहिती देताना अचूक आणि स्वतःचा अधिकार असलेली माहिती द्या.
5. कामाची मुदत
संपूर्ण मजकूर, आवश्यक तपशील आणि अग्रिम रक्कम मिळाल्यानंतर काम सुरू होईल.
कृपया आजपासून किमान ३ दिवसांनंतरची तारीख निवडा
लेखकाकडून मजकूर, सूचना किंवा दुरुस्त्यांना उत्तर मिळण्यास विलंब झाल्यास कामाची मुदत तितकी पुढे जाऊ शकते.
6. दुरुस्ती व मंजुरी
- तयार मसुदा लेखकाला तपासणीसाठी पाठवला जाईल.
- अंतिम फाइल देण्यापूर्वी दोन दुरुस्ती फेऱ्या शुल्कात समाविष्ट आहेत. प्रत्येक फेरीतील बदल लेखकाने एकत्रितपणे पाठवावेत.
- मंजूर केलेला फॉन्ट, फॉन्ट साईज, पानाचा आकार किंवा मांडणीची पद्धत नंतर बदलल्यास अतिरिक्त शुल्क व वेळ लागू शकतो.
- तिसऱ्या किंवा त्यानंतरच्या दुरुस्त्या, नवीन मजकूर जोडणे किंवा आधी मंजूर केलेली मांडणी बदलणे यासाठी स्वतंत्र शुल्क प्रती पान 20 रुपये या प्रमाणे ठरेल.
- लेखकाने अंतिम मसुद्याला लेखी किंवा WhatsApp संदेशाद्वारे मंजुरी दिल्यानंतर फाइल अंतिम मानली जाईल.
7. ISBN
- ISBN घेणे ऐच्छिक आहे. ISBN आवश्यक असल्यास तुम्ही त्यासाठी अर्ज करून ISBN काढू शकता. प्रक्रिया सोपी असून निशुल्क आहे. आम्ही त्यासाठी पूर्ण मदत करू.
8. काम रद्द करणे
- काम सुरू झाल्यानंतर लेखकाने कोणत्याही कारणास्तव काम रद्द केल्यास अग्रिम दिलेली रक्कम परत केली जाणार नाही. तुमच्या कामावर खर्च झालेला वेळ आणि काम केलेले श्रम हे त्यात समाविष्ट होतील.
9. संमती
- दोन्ही पक्षांनी वरील अटी वाचून समजून घेतल्या असून त्या मान्य आहेत. या करारपत्राची स्वाक्षरी केलेली प्रत किंवा WhatsApp द्वारे दिलेली स्पष्ट लेखी संमती (Approve) कामाच्या अटींची नोंद म्हणून ग्राह्य राहील.
( No signature required )
काम स्वीकारणाऱ्याचे नाव: Suresh Narayan Kumbhar
मोबाइल नंबर: +917709043437
ई. मेल आयडी: prabhavati.adv@gmail.com
ऑर्डर नंबर: 101
कृपया थोडा वेळ थांबा, तुमचा डेटा सेव्ह होत आहे...
करारपत्र यशस्वीरित्या सबमिट झाले आहे!
Send WhatsApp